यापुढे लॉकडाऊन लागणार की नाही? राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगून टाकलं...

प्रशांत बारसिंग
Wednesday, 22 July 2020

“महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही.

मुंबई : “महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. मात्र, मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे टोपे म्हणाले. 

मोठी बातमी - सोन्याचा नवा उच्चांक; जाणून घ्या सोन्याचा नवा उच्चांकी दर

मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, प्लाझ्मा दान यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केले.

महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा जिम सुरु कराव्यात का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. जिम हे लोकांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. तसेच राज्यातील शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबतही विचार केला जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नालासोपारा, वसई, विरार या भागातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत कामाला येतात. त्यामुळे लोकल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी अनेकजण करत आहे. लोकांची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या सोबतचा 'तो' खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स

राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणाऱ्या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स तयार केल्या जातील. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे रुम किंवा वॉर्ड करण्यात येतील. तसेच यात अंतरही ठेवले जाईल. जर यासाठी काही नियम बदलावे लागले तर तेही आम्ही बदलू. तसेच या सर्व घटनांना जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असे राजेश टोपे यावेळी  म्हणाले. धारावीत प्लाझ्मा बँक सुरु करणार, असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

( संपादन - सुमित बागुल )

there will be no lockdown in future says health minister rajesh tope


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there will be no lockdown in future says health minister rajesh tope