कोरोना लॉक डाऊन काळात लोकं सर्वाधिक सर्च करतायत 'ही' गोष्ट, कदाचित तुम्हीही हा सर्च केला असेल...

कोरोना लॉक डाऊन काळात लोकं सर्वाधिक सर्च करतायत 'ही' गोष्ट, कदाचित तुम्हीही हा सर्च केला असेल...

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वेगवेगऴ्या वस्तूंसाठी  इंटरनेटवर शोध घेण्याचे प्रमाण वाढलं आहे.लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे घरबसल्या घरघुती उपाययोजना काय करता येईल यासाठी इंटरनेटवरची शोधाशोध खूप वाढली आहे. लॉकडाऊन दरम्यान बेरोजगारी अर्जाबद्दल सर्वात जास्त सर्चींग झाली आहे. तर अगदी ब्रेड मेकींग, पाणी गरम करण्यापासून तर सिगरेट, व्हिटामीन सि गोळ्या, घरबसल्या शिलाई कशी करावी या संदर्भातही इंटरनेटवरुन टिप्स घेणाऱ्याच्या संख्येत शेकडो पटीने वाढ झाली आहे. यातील काही टॉप सर्च बघूयात

लॉकडाऊन काळातील टॉप सर्च

बेरोजगारी अर्ज - लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त शोध होतोय बेरोजगारी अर्जासाठी. हा अर्ज शोधण्याचे प्रमाण 5600 टक्क्याने वाढले आहे. जगभरात कोरोनामुळे  मोठ्या प्रमाणात बेरोजगारी  वाढण्याची भिती  आहे. 

व्हर्च्युअल कॉन्फरन्स - लॉकडाऊन काळात बहुतांश ऑफीसचे काम घरातून व्हर्चुअल कॉन्फर्रन्सच्या माध्यमातून सुरु आहे. व्हर्चुअल कॉन्फर्रन्स कशी करावी यासाठीचा शोध 322 टक्क्याने वाढला आहे.

स्काईप - स्काईप क़ॉल कसे करावे, यासाठीच्या सर्चमध्ये 239 टक्याने वाढ

रेसीपी - घरबसल्या रेसीपी शिकण्यासाठीचा सर्च 68 टक्के वाढलाय. यामध्ये लॉकडाऊन काळात घरी एकटं सापडलेल्या पुरुषांचाही समावेश आहे. 

पाणी कसं गरम करावं - अनेक व्यक्तींनी यापुर्वी आंघोळीसाठी पाणी गरम केलं नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात नाईलाजाने हे करावं लागत आहे. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी टिप्स घेणाऱ्यांच्या संख्येत 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

ब्लू लाईट ग्लासेस - सध्या घरातील जास्त वेळ डिजीटल उपकरणे बघण्यात जास्त जातो.त्यामुळे डोळ्यांना हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी ब्लू लाईट ग्लासेसचा सर्च 94 टक्के वाढला आहे. 

विटामिन सी गोळ्या -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे  सी जिवन सत्व गोळ्यांबद्दल ई क़ॉमर्स साईटवर सर्च करणाऱ्यांच्या संख्येत 532 टक्क्याने वाढ झाली आहे.

टिकटॉक लाइट -  लॉकडाऊन काळात टिकटॉक लाइट  सर्च करणाऱ्यांच्या संख्येत 531 टक्के वाढ नोंदवली गेली. तर या काळात 100 कोटी टिकटॉक शॉर्ट व्हीडीओ एप्स डाऊनलोड झाले.

नेल किट -  नेल किट शोधणाऱ्यांच्या संख्येत 431 टक्क्याने वाढ झाली आहे. ब्युटी पार्लर बंद झाल्यामुळे नेल किटचासाठीचा सर्च वाढलाय.

डंबेल्स -  जिम बंद असल्यामुळे घरी व्यायाम करावा लागत आहे. त्यामुळे घरच्या घरी डंबेल्स कशे तयार करायचे याबद्दल इंटरनेटवर जोरात सर्च सुरु आहे. 30 दिवसात डंबेल्ससाठीची सर्च मोहीम 524 टक्क्यानी वाढली आहे.

शिलाई कशी करायची -  घरात मास्क तयार कसे करावेत यासाठी ऑनलाईन टिप्स घेणाऱ्यांच्या संख्येत 266 टक्क्याने  वाढ 

ब्रेड मेकींग - ब्रेड मेकींगच्या टिप्ससाठी इंटरनेट सर्चमध्ये 288 टक्के वाढ 

सिगरेट डिलीवरी - लॉकडाऊनपासून सिगरेट, पान शॉप बंद झाल्याने अस्वस्थांची संख्या वाढलीये. त्यामुळे या काळात  सिगरेट डिलीवरीसाठी सर्च करणाऱ्यांच्या सख्येत 507 टक्काने वाढ झाली आहे

आयसोलेशन गाऊन - लॉकडाऊन काळात कुठलं गाऊन घालायचे याची विचारणा करणाऱ्या  महिलांच्या संख्येत 555 टक्क्याने वाढ. 

these are top searched things on internet during lockdown in india

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com