'या' सिने कलाकारांनी केलं मतदान; घराबाहेर पडा, मतदान करा

'या' सिने कलाकारांनी केलं मतदान; घराबाहेर पडा, मतदान करा

विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान सुरू आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत कलाकार मंडळीही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मुंबईतल्या वर्सोवामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दुसरीकडे गोरेगावच्या यशोधाम शाळेत अभिनेता अतुल कुलकर्णी पत्नीसह मतदान करण्यासाठी आला होता.

रेणुका शहाणे, किशोरी शहाणे, शुभा खोटे, पद्मिनी कोल्हापुरे यांनीही सकाळीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली. या कलाकार मंडळींनी लोकांनाही मोठ्या संख्येने मतदान करण्याचा संदेश दिलाय.

मराठी कलाकारांसोबत बॉलीवूडने पण सकाळीच मतदान केंद्र गाठलंय. अभेनेता आमिर खानने सपत्नीक  किरण रावसोबत मतदानाचा हक्क बजावला. आमिर आणि किरण राव यानंतर रितेश आणि जेनेलिया यांनीही लातूरमध्ये मतदानाचा हक्क बाजावालाय. तर मुंबईत धकधकगर्ल माधुरी दीक्षित नेने यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बाजावालाय.

दरम्यान, सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क पार पाडा असं आवाहन प्रशासन त्याचबरोबर सिनेअभिनेत्यांकडून सांगितलं जातंय. 

WebTitle: these bollywood actors and actress voted for vidhansabha 2019

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com