esakal | टिटवाळ्यातील 'हा' पादचारी पूल होणार बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

टिटवाळ्यातील 'हा' पादचारी पूल होणार बंद 

उद्यापासून नाही करता येणार वापर

टिटवाळ्यातील 'हा' पादचारी पूल होणार बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : टिटवाळा रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी असलेला 40 वर्षे जुना पादचारी पूल रहदारीसाठी सोमवार (ता. 10) पासून बंद करण्यात येणार आहे. याच स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून, हा पूल प्रवासी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेस्थानकाबाहेर पडण्यासाठी या नवीन पुलाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - ब्रेकअपनंतर बर्गर फ्री, वाचा काय आहे गूड न्यूज

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कसारा दिशेकडेही पादचारी पूल बांधावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. टिटवाळा रेल्वेस्थानकातून दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवासी संख्येसाठी एकच पादचारी पूल आहे. जुना पादचारी पूल तोडल्यास ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्‍यता प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाची बातमी - 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं

यामुळेच कसारा दिशेकडे दुसरा पादचारी पूल लवकरात लवकर बांधला जावा, अशी मागणी के-3 प्रवासी संघटनेचे सचिव शाम उबाळे यांनी केली आहे. दरम्यान, 30 मीटर लांबीच्या नवीन पादचारी पुलामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होईल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे. प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडण्याऐवजी या पुलाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने या नवीन पुलाचे काम केले आहे. 


रेल्वेस्थानकांवर सरकते जिने तसेच लिफ्टची व्यवस्था करण्यात येत आहे. टिटवाळा रेल्वेस्थानकावरही लिफ्ट मंजूर झाल्याची माहिती मिळते. या लिफ्टचे कामही लवकर झाले, तर ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होईल. 
- विवेकानंद कानिटकर, 
प्रवासी, टिटवाळा 
 

loading image
go to top