केवळ अय्याशीसाठी 'ते' चोरायचे दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

दुचाकी चोरून आणि त्यांच्यावर बनावट नंबरप्लेट लावून केवळ मौजमजा करणाऱ्या दोघांचा उल्हासनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. 

उल्हासनगर : दुचाकी चोरून आणि त्यांच्यावर बनावट नंबरप्लेट लावून केवळ मौजमजा करणाऱ्या दोघांचा उल्हासनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. 

वाईट बातमी : या वर्षात पगारवाढीची अपेक्षा ठेवू नका, कारण...

उल्हासनगर शहरात दुचाकी चोरण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त धुला टेळे यांनी या टोळीचा छळा लावण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले होते. त्यातच उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाला एक अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती.

त्यानुसार हवालदार श्‍याम सोनवणे, पोलिस नाईक सुजित निचिते, मिलिंद बोरसे, धनंजय सांगळे, पोलिस शिपाई अर्जुन मुत्तलगिरी, भरत पवार, वसंत डोळे यांनी सी ब्लॉक गुरुद्वारा येथे सापळा रचून अल्पवयीन मुलासह अरबाज ऊर्फ अरबु सयाउदद्दीन मिया याला अटक केली. 

मुंबई ते अलिबाग बोटप्रवास आता तासाभरात, हे आहेत दर

त्यांच्याकडे मिळालेली दुचाकी ही उल्हासगनर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती त्यांच्याकडून तब्बल 5 दुचाकी मिळून आल्या असून त्यांची किंमत दोन लाखाच्या घरात आहे. मौजमजा करण्यासाठी उभी असलेली दुचाकी चोरून आणि त्यावर बनावट नंबरप्लेट लावून फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'they' steal Bike only for enjoyment