त्यांना पगार करावेच लागतील - मुख्यमंत्री

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई : गुढीपाडवा आला तरी मुंबईतल्या माझ्या शिक्षकांचे पगार नाहीत. शाळेतले शिपाई, क्लार्क तर हवालदिल झाले आहेत. हायकोर्टाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश सुद्धा मानायला शिक्षणमंत्री तयार नाहीत.

शिक्षकांना का छळता? असा सवाल करत आमदार कपिल पाटील यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणं धरलं. तावडे न पाहता निघून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आवर्जून थांबले. आमदार कपिल पाटील यांना मुख्यमंत्री म्हणाले, मी आदेश दिले आहेत. त्यांना पगार करावेच लागतील. 

Web Title: They will have to pay salaries - Chief Minister