
डोंबिवली : रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास चाकूचा धाक (knife threatening to people) दाखवून लुबाडणाऱ्या लुटारुस (robbery crime) ठाणे गुन्हे आर्थिक शाखेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक (culprit arrested) केली आहे. अक्षय अहिरे (वय 22) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर दाखल 8 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ठाणे मुख्यालयातील पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय अहिरे हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात कुंजविहार वडापाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. भोसले यांनी त्वरीत याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल होनराव यांच्याशी संपर्क साधत दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे शाखेचे पोलिस हवालदार चंद्रकांत ठाकरे, किशोर भामरे, राजेंद्र घोलप, नागराज रोकडे, अक्षय राऊत यांनी घटनास्थळी सापळा रचून अक्षयला अटक केली. तपासात अक्षयने 15 ऑक्टोबर 2021 मध्ये पहाटे 4.45 च्या दरम्यान तिघा मित्रांच्या सहाय्याने एका जेष्ठ नागरिकाचे रिक्षा भाडे घेतले. डोंबिवली रेल्वे स्थानकडे जात असताना त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि 4 हजाराची रोख रक्कम उकळून ज्येष्ठ नागरिकास धक्काबुक्की करत रिक्षातून ढकलून देत पळ काढला होता.
टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही लुटमार झाली असून त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच टिळकनगर व डोंबिवली पोलिस ठाण्यात त्याच्यावर रॉबरी व मोबाईल चोरीचे 8 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपासासाठी अक्षय याला टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.