चोराला गाठले...  हनिमून पॅकेज मिळाले...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

चार किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वेंकटेश यांनी चोराला गाठले आणि पोलिस ठाण्यात घेऊन आले. वेंकटेश यांचे हे धाडस पाहून डीसीपी खूश झाले. त्यांनी वेंकटेशला दहा हजारांचे रोख बक्षीस दिलेच; परंतु वेंकटेश यांचे नुकतेच लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्यांना केरळचे तीन दिवसांचे हनिमून पॅकेजही बहाल केले. 

बंगळूर : पोलिस खात्यात नव्यानेच रुजू झालेल्या एका कॉन्स्टेबलने पाठलाग करत चोराला पकडल्याने खूश होऊन पोलिस उपायुक्तांनी त्याला रोख रक्कम बक्षीस तर दिलीच, शिवाय हनिमून पॅकेजचीही भेट दिली. 

बंगळूरमधील बेलंदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कॉन्स्टेबल वेंकटेश काही महिन्यांपूर्वीच सेवेत रुजू झाले आहेत. एका चोरट्याने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि दुचाकीवरून पळ काढला. त्यामुळे संबंधित व्यक्तीने जोरात आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून वेंकटेश यांनी तातडीने दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला.

चार किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वेंकटेश यांनी चोराला गाठले आणि पोलिस ठाण्यात घेऊन आले. वेंकटेश यांचे हे धाडस पाहून डीसीपी खूश झाले. त्यांनी वेंकटेशला दहा हजारांचे रोख बक्षीस दिलेच; परंतु वेंकटेश यांचे नुकतेच लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्यांना केरळचे तीन दिवसांचे हनिमून पॅकेजही बहाल केले. 

Web Title: The thief got honeymoon package