esakal | भविष्य सांगतो सांगत, सोने घेऊन फरार

बोलून बातमी शोधा

भविष्य सांगतो सांगत, सोने घेऊन फरार

बोडी आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल

भविष्य सांगतो सांगत, सोने घेऊन फरार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : भविष्यवाणी सांगण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या भामट्याने हातचलाखीने गृहिणीची सोनसाखळी लांबवून धूम ठोकली; तर दुसऱ्या घटनेत दोघे भामटे वृद्ध गृहिणीचा 1 लाख 18 हजारांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. दोन्ही घटना मंगळवारी (ता. 18) दिवसाढवळ्या घडल्याने वृद्ध महिला धास्तावल्या आहेत. याप्रकरणी राबोडी आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या 52 वर्षीय महिला आपल्या घरी बसल्या असताना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरात एक भामटा शिरला. त्याने सदर महिलेची व त्यांच्या कुटुंबांची भविष्यवाणी सांगून बोलण्यात गुंतवले. तसेच एका कोऱ्या कागदावर ओम गणपतेय नमः असे लिहून दुसऱ्या कोऱ्या कागदामध्ये 15 हजार 350 रुपये किमतीची सोनसाखळी पुडीमध्ये बांधून हातात दिली. थोड्या वेळानंतर पुडीतून काढून सोनसाखळी परिधान करण्याचा सल्ला देत धूम ठोकली. काही वेळाने सोनसाखळी लांबवल्याचे लक्षात आले.

महत्त्वाची बातमी - आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

याप्रकरणी, राबोडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दुसऱ्या घटनेत वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धा कामगार नाका येथे उभ्या असताना दुपारच्या सुमारास दोन भामट्यांनी त्यांना हाताला धरून वागळे स्मशानभूमीकडील रस्त्यावर नेले व त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी व सोन्याच्या दोन बांगड्या असा 1 लाख 18 हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. 

web title : thief Run away with gold