
आझाद मैदानावर नव्या सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. मात्र असे असतानाही चोरट्यांनी अनेक उपस्थितांना लुटले आहे. यात काही महिलांसह १३ जणांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.