
Shahapur: सोन्याचा व्यापार उरकून संगमनेर मार्गे मुंबईनाका नाशिकहून मुंबईच्या दिशेने परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने निघालेले व्यापारी किरणकुमार धनराज पुरोहित यांच्याजवळील १ कोटी ६८ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि २ लाख रोख रक्कमेवर चौघा अज्ञातांनी डल्ला मारला आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गाच्या खर्डी-कसारा दरम्यान असलेल्या उंबरमाळी गाव हद्दीतील हॉटेल फेमस येथे बस उभी राहिली असता घडली असून