उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार 

उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार 

उल्हासनगर : शिक्षणाची इच्छा असूनही काही बंधने किंबहुना अडचणी असल्याने त्यापासून वंचित राहणाऱ्या उल्हासनगरातील शेकडो किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. उल्हासनगरमधील चांदीबाई महाविद्यालयात किन्नरांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांना येणाऱ्या अडचणी, भविष्यातील गरजा ओळखून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून किन्नर समुदायाला ओळखपत्रे बनविणे, बॅंकेत खाते उघडताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात आल्यानंतर वाण्या फाऊंडेशन ऑफ उल्हासनगर, किन्नर अस्मिता, इंडस एज्युकेशन या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात किन्नर समुदायाला आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे, स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे या विषयीची चर्चा झाली. सिंधू एज्युकेशन सोसायटीने किन्नरांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे; तर कोणार्क बॅंक व इतर बॅंकांनीदेखील किन्नरांना बॅंक खाते उघडण्यास योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 

रोज थोडे-थोडे पैसे बचत करून बॅंकेत जमा करण्यासाठी डेली कलेक्‍शन करण्यात येईल. त्यासाठी किन्नर समुदायातर्फे प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल. "होप' या संस्थेने भारतातील पहिले "एलजीटीबी मॅट्रिमोनी' सुरू केले असून त्यात सर्वाधिक अर्ज उल्हासनगरमधील किन्नर समुदायाचे असल्याचे मॅट्रिमोनीच्या प्रतिनिधीने सांगितले. या वेळी ऍड. मोनिष भाटिया, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा, ज्योती तायडे, किन्नर अस्मिता संघटनेचे 125 किन्नर मित्र, नीता काणे, मुजरा नानी, विद्यासागर देडे उपस्थित होते. 

पदवीपर्यंत शिक्षण घेणार 
किन्नर समुदायामध्ये अनेक जण सुशिक्षित आहेत. काहींचे शिक्षण अर्धवट आहे. त्यांची शिक्षणाची तीव्र इच्छा आहे. या शिबिरात 12 वीपर्यंत शिक्षण झालेल्या जवळपास 20 किन्नरांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले असून, ते आता पदवीपर्यंत शिक्षण घेणार आहेत. त्याचप्रमाणे 10 वी पास व नापास असलेल्या अनेकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी आमच्या "वाण्या' संस्थेने घेतल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व टीम ओमी कालानी गटाच्या नगरसेविका रेखा ठाकूर यांनी दिली. 

third gender in Ulhasnagar in the mainstream Initiatives of educational and social institutions  
=----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com