

NAINA Development Plan Targets 15 Lakh Jobs as Devendra Fadnavis Positions Third Mumbai as a Major Growth Engine for Maharashtra
sakal
पनवेल : ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ‘नैना’ (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्राच्या विकासामुळे आर्थिक प्रगतीला नवे क्षीतिज खुले होणार आहे. भविष्यात ‘नैना’ परिसरात १५ लाख रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरढोण (ता. पनवेल) येथे आज केले. भविष्यात हा परिसर राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.