लसीकरण कमी, गोंधळच अधिक; लसीकरणाचा तिसरा टप्पा

लसीकरण कमी, गोंधळच अधिक; लसीकरणाचा तिसरा टप्पा

मुंबई, ता. 1 : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या  लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोविन डिजिटल ऍपमधील तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांना ऍपची नसलेली  माहीती, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव यामध्ये आजच्या लसीकरण मोहिमेत गोंधळच अधिक झाल्याचे दिसले. 

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सोमवारपासून ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 वयोगटातील दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. खासगी रुग्णालयांना ही लसीकरणाची परवानगी देण्यात आली असून लसीसाठी प्रति डोस 250 रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली. लसीकरणाच्या या  प्रक्रियेत अडचणी उद्भवल्याच्या खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते 5 वाजण्याच्या दरम्यान असते. कोविड डिजिटल ऍपच्या तांत्रिक अडचणीमुळे दुपारी साडे तीन वाजेपर्यंत लसीकरण सुरू झाले नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत ही लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. अनेक लाभार्थी लस घेण्यासाठी थेट आपल्या जवळच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पोहोचले होते मात्र त्यांना त्यांचे लसीकरण तेथे होणार नसल्याचे सांगून दुसरीकडे पाठवण्यात आले. 

कोविन अँप रजिस्ट्रेशन सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आले. मात्र ऍप  वापरण्यात अनेक अडचणी आल्या. सकाळी तब्बल दोन ते तीन तास ऍप उघडलाच नाही. त्यामुळे निर्धारित वेळेत लसीकरण सुरू करता आले नाही असे इंडियन मेडिकल काऊन्सिलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ शिवकुमार उतुरे यांनी सांगितले. दुपार नंतर ऍप सुरू झाला मात्र तो फारच धीम्या गतीने सुरू असल्याने लाभार्थींची मोठी गर्दी झाली होती. काही ठराविक खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती तेथे ही या गोंधळामुळे लसीकरण सुरूच झाले नसल्याचे ही डॉ उतुरे यांनी सांगितले. 

खासगी नर्सिंग होम, खासगी रुग्णालये, आयुष्यमान भारत, पंतप्रधान महात्मा फुले आरोग्य योजना असलेल्या याखाली जी रुग्णालये रजिस्टर आहेत त्यात लसीकरण सुरू होणार आहे. मात्र पैसे कसे भरायचे किंवा सरकारला देताना कशा पद्धतीने द्यायचे या संदर्भातील माहिती रुग्णालयांना मिळालेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांत ही मोठ्या प्रमाणात संभ्रम दिसला. हा संभ्रम दूर करणे गरजेचे असून बहुतांश मोठ्या खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू करणे गरजेचे असल्याचे ही डॉ उतुरे यांनी सांगितले.

सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या खासगी रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत याअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित असल्याने जास्तीत जास्त खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देणे गरजेचे असल्याचे ही डॉ उतुरे यांनी सांगितले. लसीकरणासाठी आवश्यक असणारे  प्रशिक्षण अद्याप खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. 

सर्वसामान्यांना कोविन डिजिटल ऍप वापरणे अवघड आहे. आरोग्य सेतू वापरा आणि रजिस्ट्रेशन करा असेही सांगण्यात आल्याने नेमके काय करावे याबाबत ही संभ्रम निर्माण झाला आहे. लसीकरणाची यंत्रणा राबवणे , अंमलबजावणी आणि कोविन अप चे रजिस्ट्रेशन अनेक ठिकाणी झालेले नाही. शिवाय रुग्णालयांना अधिकृत पत्र नाही त्यामुळे खासगी रुग्णालयांत आठवडाभर लसीकरण सुरू होणे अवघड असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे आयएमए अध्यक्ष महाराष्ट्र यांनी सांगितले. 

third phase of corona vaccination chaos in terms of vaccination seen in mumbai and maharashtra


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com