तिसरी खासगी एक्‍स्प्रेस महाशिवरात्रीपासून धावणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मुंबई : देशातील तिसरी खासगी एक्‍स्प्रेस इंदूर ते वाराणसी या मार्गावर महाशिवरात्रीपासून (21 फेब्रुवारी) धावणार आहे. "काशी महाकाल एक्‍स्प्रेस' असे नाव दिलेल्या या गाडीला हमसफर एक्‍स्प्रेसचे डबे जोडले जाणार आहेत. 

मोठी बातमी फडणवीसांना आणखी एक धक्का

मुंबई : देशातील तिसरी खासगी एक्‍स्प्रेस इंदूर ते वाराणसी या मार्गावर महाशिवरात्रीपासून (21 फेब्रुवारी) धावणार आहे. "काशी महाकाल एक्‍स्प्रेस' असे नाव दिलेल्या या गाडीला हमसफर एक्‍स्प्रेसचे डबे जोडले जाणार आहेत. 

मोठी बातमी फडणवीसांना आणखी एक धक्का

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने खासगी एक्‍स्प्रेस चालवण्यात येत आहेत. देशातील 100 मार्गांवर अशा 150 खासगी एक्‍स्प्रेस चालवण्यात येणार आहेत. या 150 गाड्या चालवण्यासाठी सुमारे 22 हजार 500 कोटींची गुंतवणूक केली जाईल. दिल्ली ते लखनऊ, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गांवर तेजस एक्‍स्प्रेस चालवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा पैशाच्या वादातून त्यांनी आवळला बारमालकाचा गळा

आता इंदूर ते वाराणसीदरम्यान काशी महाकाल एक्‍स्प्रेस 21 फेब्रुवारीपासून धावणार आहे. या गाडीला चेअर कारऐवजी शयनयान डबे जोडले जातील. रात्रीच्या वेळी प्रवास असल्याने या गाडीला हमसफर एक्‍स्प्रेसचे डबे जोडण्यात येणार आहेत. ही एक्‍स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा लखनऊमार्गे आणि एकदा अलाहाबादमार्गे धावणार आहे. 

The third Private Express will run from Mahashivratri


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third Private Express will run from Mahashivratri