ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ३५.६ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, ठाणे तालुक्यात सर्वाधिक ५५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.