#Coronavirus: मुंबईत संशयतांची कसून तपासणी! यंत्रणेला 'हाय अलर्ट'वर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

  • मुंबईत कोरोना संशयितांची कसून तपासणी 
  • कोरोना रुग्णांसाठी 100 खाटांची तयारी 
  • तपासणीसाठी 26 पथकं सज्ज; 
  • विमानतळांवर विशेष तपासणी पथकं 

मुंबई : कोरोना विषाणूंचा वाढता प्रभाव लक्षात घेत या विषाणूंचा रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे.मुंबईतील चार रुग्णालयांत 100 खाटांची तयारी करण्यात आली असून प्रत्येक विभागात कार्यालयात विशेष पथक नेमले आहे.या पथकांकडून प्रत्येक कोरोना संशयिताची कसून तपासनी करण्यात येत आहे. 

धक्कादायक! घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न 

जगभरात कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असून जगातील 70 देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे.दिल्ली , राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या विषाणूंचा भारतात ही शिरकाव झाल्याचे समोर आले.मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात या विषाणूंचा शिरकाव झाला तर मात्र परस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत.पालिकेच्या प्रत्येक विभागात डॉक्‍टरांचं विशेष पथक तयार करण्यात आले असून पालिकेच्या विभाग कार्यालयांत 24 तसेच विमानतळांवर 2 अशी 26 विशेष पथक तैनात ठेवण्यात आली आहे. 

प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!

कोरोना विषाणूंची श्वासनास त्रास,सर्दी,खोकला अशी लक्षण असल्याने अश्‍या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. ह्या प्रकारची लक्षण आढळल्यास तात्काळ पालिका रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय पालिकेच्या विशेष पथकाकडून देखील तपासण्या सुरू करण्यात आल्या असून प्रत्येक विभाग कार्यालयातील पथकाकडून संशयितांची कसून तपासणी करण्यात येत आहे.एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यास त्यास तात्काळ पालिकेच्या विशेष विलगिकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.यासाठी शहर,पूर्व , पश्‍चिम उपनगरांतील कस्तुरबासह ट्रॉमा सेंटर,शताब्दी रुग्णालय,सायन रुग्णालय खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A thorough investigation of Coronavirus suspects in Mumbai