योद्धेच ठरतायत कोरोनाचे भक्ष्य; मुंबई महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना बाधा

bmc
bmc

मुंबई ः मुंबई महापालिकेचे कर्मचारी कोरोनाच्या साथीत अथकपणे काम करत आहेतच. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण, कॉन्टक्ट ट्रेसिंग, झोपडपट्टयातील नागरिकांची चाचणी त्याचबरोबर गरजूंना जेवण पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत होती. मात्र, महापालिकेकडून माहिती जाहीर केली जात नव्हती. परंतु पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही माहिती जाहीर केली आहे. कोविडने मुंबई महानगर पालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत बळी घेतला आहे, तर 1500 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना पालिकेकडून त्यावर उपाययोजना म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पालिकेचे हजारो कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत काम करत आहे. मात्र आपले कर्तव्य बजावत असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना आजाराला बळी पडावे लागत असल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांना बाधा झाली आणि त्यात किती जणांचा बळी गेला, याबाबत महापालिकेकडून पहिल्यांदाच माहिती जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेच्या कर्मचारी संघटनामकडून हि माहिती जाहीर करण्याची मागणी केली जात होती.त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व विभागातील प्रमुखांनी त्याच्या विभागातील कोविड बाधित व्यक्तींची माहिती जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, त्यानंतरही माहिती जाहीर केली जात नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com