चुलबुल पांडेचा नवा अंदाज; दबंग येतोय आता नव्या रुपात...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 27 May 2020

दबंग चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डूपर हिट ठरल्यानंतर या चित्रपटाच्या फ्रेंचायझीनी आणखी दोन चित्रपट आणले ते म्हणजे 'दबंग २' आणि 'दबंग ३'. या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमान खानच्या अशाच एका सुपरहिट चित्रपटाचे नाव म्हणजे 'दबंग'. दबंग चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डूपर हिट ठरल्यानंतर या चित्रपटाच्या फ्रेंचायझीनी आणखी दोन चित्रपट आणले ते म्हणजे 'दबंग २' आणि 'दबंग ३'. या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता सलमानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 'दबंग' चित्रपट अ‍ॅनिमेटेड अवतारात दिसणार आहे. हा अनिमेटेड दबंग चित्रपट दोन भागात दाखवण्यात येणार आहे. पहिला भाग 52 भाग दाखवले जाणार आहेत. हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

मोठी बातमी ः कोरोना रुग्णांची सेवा करणारे निवासी 'डॉक्टर' विद्यावेतनावरुन नाराज

सलमानचा त्याच्या अभिनय कारकिर्दीतील दबंग हा सर्वात हिट ठरलेला चित्रपट आहे. त्याने चित्रपटात साकारलेले चुलबुल पांडेची भूमिका ही सर्वांना लक्षात राहण्यासारखी आहे. दबंगच्या या अ‍ॅनिमेटेड चित्रपटातून चुलबुल पांडे देखील नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अ‍ॅनिमेटेड दबंग चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांचे बऱ्याचशा ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बोलणं सुरू आहे. या चित्रपटाचे अभिनेता- निर्माता अरबाज खान म्हणाला की,  दबंगची खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट कुटुंबाचे मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि या चित्रपटाच्या सिरिजला पुढे नेण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे अ‍ॅनिमेशन हा आहे.

मोठी बातमी ः अनिल परब यांनी केली फडणवीसांच्या आकडेवारीची पोलखोल

यापुढे अरबाज म्हणाला की,' या माध्यमातून आपल्याला चित्रपटाची कथा दाखवायला रचनात्मक स्वातंत्र मिळते आणि आपण लांबलचक कथांपेक्षा छोट्या कथांवर लक्ष केंद्रित करू शकतो. चित्रपटातील चुलबुल पांडेची भूमिका ही फार अकर्षक आहे आणि अ‍ॅनिमेशनद्वारे ही भूमिका नव्या अंदाजात दाखवली जाणार आहे.'

मोठी बातमी ः राज्यपालांनी जारी केली अधिसूचना..'या'लोकांना होणार फायदा.. 

या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची 'कॉस्मोस- माया' ही कंपनी निर्मिती करत आहे. याबाबत अरबाज म्हणाला,' आम्हाला आहे की कॉस्मोस- माया सोबत आम्ही या चित्रपटाचे काम करत आहोत. ज्यांनी याआधी लाखो प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.' या अ‍ॅनिमेटेड चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची भूमिका रज्जो, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी साकारलेली भूमिका प्रजापती, दबंग चित्रपटाच्या तीनही चित्रपटांचे खलनायक अभिनेता सोनू सूद, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांची भूमिका बच्चा भैया यांच्या भूमिका देखील अ‍ॅनिमेटेड स्वरूपात दाखवल्या जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dabang movie will release in animated form