ठाणे जिल्ह्यात बचतगटांकडून हजारो मास्कची निर्मिती 

राहुल क्षीरसागर
बुधवार, 15 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्कची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी मास्क निर्मितीसाठी पुढाकार घेत, कमी दारात मास्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यतील १८ महिला बचत गटांच्या माध्यमातून 52 हजार मास्काची निर्मिती करण्यात आली आहे. यातील सुमारे 19 हजार मास्काची विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्कची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी मास्क निर्मितीसाठी पुढाकार घेत, कमी दारात मास्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जिल्ह्यातील भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यतील १८ महिला बचत गटांच्या माध्यमातून 52 हजार मास्काची निर्मिती करण्यात आली आहे. यातील सुमारे 19 हजार मास्काची विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

क्लिक करा : धक्कादायक! भारतातील वटवाघुळांतही आढळला कोरोना

राज्यात कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता राज्य सरकारच्या वतीने 21 मार्चपासूनच लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेली सर्व अस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातही मंगळवारी हा आकडा 249 वर पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत असतांना, मास्कचा वापर करण्याचा सल्ला वेळोवेळी आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.

त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी होत असून उपलब्ध असलेल्या मास्कची चढ्या भावाने विक्री होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मास्क निर्मितीसाठी पुढाकार घेत, कमी दारात मास्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जिल्ह्यातील भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील 18 महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क तयार करण्यात आले आहे. हे मास्क अवघ्या 15 ते 20 रुपयांत मिळणार आहेत. या बचत गटांमार्फत आतापर्यंत 52 हजार मास्काची निर्मिती करण्यात आली असून आतापर्यंत 18 हजार 870 मास्काच्या विक्रीतून दोन लाख 89 हजार 200 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती जिल्हा प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली. दरम्यान, या बचत गटांनी सामाजिक बांधिलकी जप्त गावागावांमध्येही मास्कचे वाटप केले आहे.

क्लिक करा : ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात 

मास्क तयार करण्यासाठी लागणारा कापड महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेले मास्क हे ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. त्यामुळे मास्कचा तुटवडा जाणवत नाही. 
- हिरालाल सोनवणे, 
मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे.

तालुका      बचत गटांची संख्या    मास्क निर्मिती      मास्क विक्री

अंबरनाथ    02                             650                350

भिवंडी        05                            40 हजार 300    14 हजार 120

कल्याण     11                             11 हजार 100     4 हजार 400

एकूण        18                              52 हजार 050    18 हजार 870


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of masks are manufactured by Bachat gats in Thane district