
Adivasi community leaders announcing the Palghar ‘Mahamorcha’ to protest against the Banjara reservation demand.
Sakal
- निखिल मेस्त्री
पालघर : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी एकीकडे राज्यभर आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये सामावून घेऊ नये यासाठी आदिवासी समाजानेही तितकाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंजारा धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या एकच मागणीसाठी पालघरमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर) प्रति महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाज यांची संस्कृती, परंपरा आदिवासी समाजाशी समरस नाही. त्यामुळे त्यांना आमच्या प्रवर्गाचा दर्जा देऊ नये अशा मागणीसाठी हा महामोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली या आक्रोश मोर्चाचे आयोजन आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीमार्फत करण्यात आले आहे.