विनातिकीट प्रवासाला आता हजारांचा दंड?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडात्मक रकमेत चार पटीने वाढ करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. सध्या विनातिकीट प्रवाशांकडून २५० अधिक १० रुपये प्रवासी भाडे, असे एकूण २६० रुपये दंडात्मक कारवाई केली जाते. ही रक्कम थेट हजार रुपयांपर्यंत व्हावी, असा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेने मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विनी लोहानी यांच्यापुढेही सादर केला आहे. प्रवाशाला हॅंड हेल्ड मशीनमधून दंड भरता यावा यासाठी ‘क्रीस’ प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या कायद्यात बदल करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Thousands of penalties withour ticket train