26/11सारखा हल्ल्याची मुंबई पोलीसाना धमकी; नागरिकांनी घाबरु नये,पोलीस आयुक्तांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

threat of 26 11 attack on mumbai message to traffic control room-of mumbai police

26/11सारखा हल्ल्याची मुंबई पोलीसाना धमकी; नागरिकांनी घाबरु नये,पोलीस आयुक्तांचे आव्हान

मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरवर शुक्रवारी 19 ऑगस्टला रात्री 11.47 मिनिटांनी धमकीचा मेसेज आल्याची घटना मुंबईत घडली. 26/11 सारखा मुंबईत हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. धमकीचा मेसेज आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात वरळी पोलिस ठाण्यात कलम 506(2) अंतर्गत धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर दिलेल्या मेसेजमध्ये मुंबईत आणखी 26/11 चा हल्ला होण्याची मंशा व्यक्त केली आहे.पाकिस्तानी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आला आहे. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झालं असून तपास सुरु केला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचं आवाहन केलेय. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले.

धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटलेय?

मेसेज करणाऱ्यानं म्हटले आहे तुम्ही लोकेशन ट्रेस केल्यास ते भारताबाहेर दिसेल आणि बॉम्बस्फोट मुंबईत होईल, असे मेसेज करणाऱ्याने लिहिले आहे. या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतात राहणारे 6 व्यक्ती त्यांचे सहकारी या कामासाठी मदत करणार आहेत. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासोबतच इतर दहशतवाद विरोधी पथक आणि इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

लाहोरमधून आला कॉल!!

पाकिस्तानमधून ज्या क्रमांकावरुन धमकीचा मेसेज आला होता, त्याला सुरक्षा यंत्रणांनी संपर्क केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीच्या क्रमांकावरुन धमकीचा मेसेज आला आहे. इम्तियाज पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. ते म्हणाले की, 'मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मुंबई गुन्हे शाखा याबाबात सखोल कारवाई करत आहे. तसेच यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

“भारताचा फोन नंबर पाकिस्तानमधून हॅक केला जाऊ शकतो. या क्रमांकाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्याकडे आतापर्यंतची सर्व माहिती आम्ही एटीएस महाराष्ट्रसोबत शेअर करत आहोत, असे मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.