

Sanjay Raut Threat Car
ESakal
मुंबईतून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाजवळ उभ्या असलेल्या एका कारच्या काचेवर धमकीचा संदेश लिहिलेला आढळला. संदेशात असे म्हटले होते की, आज दंगल होईल आणि मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होईल. या माहितीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.