मुंबई बॉंबस्फोटातील तीन दोषींना 'फर्लो' मंजूर

Mumbai-Bomb-Blast
Mumbai-Bomb-Blast

मुंबई - मुंबईतील 1993 मधील साखळी बॉंबस्फोटप्रकरणी 24 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या तीन दोषींना 28 दिवसांची 'फर्लो' (तात्पुरती रजा) उच्च न्यायालयाने नुकतीच मंजूर केली. पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) स्वाती साठे यांनी 15 डिसेंबर 2018 रोजी रजेचे अर्ज नामंजूर केल्यावर या तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी औरंगाबाद तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले फरीदुल्ला कुरेशी, इक्‍बाल अहमद शेख आणि शेख उमर यांनी 28 दिवसांच्या रजेसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्या. आर. आर. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. पुण्यातील येरवडा तुरुंगाच्या अंतर्गत औरंगाबाद तुरुंग येत असल्याने त्यांनी "फर्लो' मिळण्यासाठी अर्ज केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com