प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक

प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक
प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक

नवी मुंबई : लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, या चोरट्यांकडून चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या तिन्ही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली.

भांडुप येथे राहणारा गणेश रमाशंकर कनौजिया (२४) हा तरुण बुधवारी (ता. १४) ठाणे स्टेशनहून लोकलने नेरूळला जात होता. या वेळी तुर्भे रेल्वे स्थानकात येऊन इरफान अक्रम राईन (१९) या चोरट्याने गणेशच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन केले; मात्र गणेशने तत्काळ पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिल्याने पोलिसांनी इरफान अक्रम राईन याला पकडून त्याने लुटलेला मोबाईल त्याच्याकडून हस्तगत केला.

तर सोमवारी (ता. १२) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नागेश रमेश हिरवे (१९) या लुटारूने वाशी-ठाणे लोकलमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या अंकुश दिनकर बेड (२३) या तरुणाच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसी टीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन त्यालादेखील अटक केली. नागेश हिरवे याच्यावर जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल असून, त्याला शिक्षादेखील झाली आहे; मात्र नुकताच तो जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर सस्ते यांनी दिली. नागेशवर यापूर्वी तडीपारीची कारवाईदेखील करण्यात आल्याचे सस्ते यांनी सांगितले. 

तर तिसऱ्या घटनेत एपीएमसीतील मसाला मार्केटमध्ये राहणारा अब्दुल्ला सबीर खान (२४) हा गुरुवारी (ता. १५) पहाटे ४.३० वाजता पनवेल येथून सानपाडा रेल्वे स्टेशनवर उतरला; मात्र त्या ठिकाणी असलेल्या गुड्डू बसवराज होनकोरे याने अब्दुल्ला याच्या खिशातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला; मात्र उपस्थित प्रवाशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुड्डू बसवराज होनकोरे (१८) याला पकडून ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुह्यात अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com