विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई - भांडुप येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सुशील वर्मा याच्या खूनप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राहुल ब्रीजलाल जयस्वार (19), संजय महेद्र यादव (24) आणि विजेंद्र राजभर(21) अशी त्यांची नावे आहेत. 

राहुल हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने दोन मित्रांच्या मदतीने हा खून केला. राहुलचे एका मुलीवर प्रेम होते. सुशीललाही ती मुलगी आवडत असल्याने राहुलने साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुशील भांडुपमधील सर्वोदय येथील महाविद्यालयात शिकत होता. गुरुवारी सकाळी राहुलने त्याल वर्गाबाहेर बोलावले. सुशील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर मारेकऱ्यांनी पलायन केले होते. 

Web Title: Three arrested on the students murder

टॅग्स