आई गं ! अवघ्या तीन दिवसांच्या बाळासह आई-वडिलांना कोरोना 

आई गं ! अवघ्या तीन दिवसांच्या बाळासह आई-वडिलांना कोरोना 

मुंबई - चेंबूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन दिवसांच्या बाळासह आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. या तिघांनाही महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चेंबूर कॅम्प परिसरात राहणाऱ्या गर्भवतीला चेंबूर नाका येथील एका खासगी रुग्णालयात 26 मार्चला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले. सकाळी 11.30 वाजता तिची सिझेरिअयन सेक्‍शन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. तिच्या पतीने खासगी खोलीची मागणी केली. तेथील रुग्णाला घरी सोडल्यानंतर खासगी खोली देऊ, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर रिकामी झालेली खोली या महिलेला देण्यात आली. कुलूप तुटल्यामुळे खोली रिकामी करा, असे त्यांना काही वेळाने सांगण्यात आले. कुलूप नसले तरी चालेल, असे या महिलेच्या पतीने स्पष्ट केले; परंतु खोलीची साफसफाई करण्याचा आदेश महापालिकेने दिल्याचे सांगण्यात आले. 

दुसऱ्या दिवशी, 27 मार्चला महिला प्रसूतितज्ज्ञाने महिलेला दूरध्वनी केला. काल तुम्हाला दिलेल्या खोलीतील आधीचा रुग्ण कोरोनाबाधित होता. त्यामुळे तपासणीसाठी त्या खोलीत येऊ शकणार नाही, असे त्या म्हणाल्या. आपल्याला खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले; मात्र रुग्णालयाने कारण दिले नव्हते. त्यामुळे आम्ही ती खोली सोडली नाही, असे या महिलेच्या पतीने सांगितले. त्यानंतर 28 मार्चला रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. नवजात अर्भकासह या दाम्पत्याचीही खासगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यासाठी त्यांना 13 हजार 500 रुपये शुल्क भरावे लागले. कोरोना चाचणीचा अहवाल मात्र मिळाला नव्हता. 

या रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तेथे प्रसूती झालेली महिला व तिच्या दोन दिवसांच्या बाळालाही बाधा झाल्याचे समोर आले. या महिलेला 31 मार्चला खासगी रुग्णालयाने डिस्चार्ज देऊन कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार रुग्णालयाचे बिल चुकते करून रुग्णवाहिकेतून पत्नी व बाळाला भाभा रुग्णालयात नेले. रुग्णवाहिकेचे 3000 रुपये भरण्यास एका डॉक्‍टराने सांगितले; परंतु पैसे नसल्याने मी नकार दिला, अशी माहिती या महिलेच्या पतीने दिली. त्यानंतर भाभा रुग्णालयातील डॉक्‍टरांना विनंती करून आम्ही कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालो. आता तेथेच उपचार घेत आहोत, असे त्याने सांगितले. 

महिला कर्मचाऱ्यालाही बाधा 

दुबईहून आलेला एक रुग्ण 23 मार्चला चेंबूर येथील या खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला 25 तारखेला सोडण्यात आले. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले; परंतु या रुग्णालयाने तीच खोली प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दिली. त्यामुळे या महिलेसह तिच्या नवजात अर्भकाला आणि पतीलाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्या तिघांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच रुग्णालयातील एका कर्मचारी महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. तिला बुधवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे आई, वडील आणि पाच वर्षांच्या मुलाची कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली. 

दुबईवरून आलेला रुग्ण या खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला घरी सोडल्यानंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले. रुग्णालयातील काही रुग्णांना डिस्चार्ज देण्याची व काही रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्याची सूचना दिली. हे खासगी रुग्णालय आता बंद केले आहे. - भूपेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी (एम पश्‍चिम वॉर्ड), मुंबई महापालिका. 

three days adolescent gets covid19 infection in mumbai read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com