तीन दिवस मेगाब्लॉकचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बरवर विशेष ब्लॉक
मुंबई - उपनगरी रेल्वेवरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती व हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारपासून (ता. 28) तीन दिवस पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बरवर विशेष ब्लॉक
मुंबई - उपनगरी रेल्वेवरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती व हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारपासून (ता. 28) तीन दिवस पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्‍चिम रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. वसई रोड ते भाईंदरदरम्यान दोन्ही दिशांच्या धीम्या मार्गावर शुक्रवारी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. रविवारी (ता. 30) हार्बर मार्गाचा विस्तार करण्यासाठी जोगेश्‍वरी स्थानकात बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर नऊ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत हा ब्लॉक असून, या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल राम मंदिर स्थानकात थांबतील.

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळदरम्यान शनिवारी (ता. 29) विशेष ब्लॉक घेण्यात येईल. या दरम्यान रुळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुपारी 12.35 ते 2.05 या वेळेत दोन्ही दिशांच्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ठाणे-वाशी, पनवेल, नेरूळ या स्थानकांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे ट्रान्सहार्बरवरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेने दिली आहे.

ट्रान्सहार्बरवरील रद्द होणाऱ्या फेऱ्या
ठाणे ते वाशी- दुपारी 12.12, 12.40, 1.01, 1.25 व 1.57 ची लोकल
ठाणे ते नेरूळ- दुपारी 12.20, 1.10, 1.37 ची लोकल
ठाणे ते पनवेल- दुपारी 12.52, 1.18, 2.05 ची लोकल

वाशी ते ठाणे- दुपारी 12.21, 12.49, 1.18, 1.40 व 2.02 ची लोकल
नेरूळ ते ठाणे- दुपारी 12.10, 12.31, 1 व 1.50 ची लोकल
पनवेल ते ठाणे- दुपारी 12.18, 1.04 ची लोकल

Web Title: three days megablock