

Fire News
ESakal
ठाणे : नववर्षाच्या प्रारंभाला ठाणे शहरात आगीच्या तीन घटना समोर आल्या असून त्या तिन्ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोन ते पावणे तीन वाजण्याच्या दरम्यानच्या आहेत. त्या घटना किरकोळ असल्या तरी कोपरी आणि वागळे या दोन घटनांमध्ये सहा जण थोडक्यात बचावले आहेत. तर, कोपरीतील घटनेत लाकडी टेबल, आरसा व इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झाले आहे.