esakal | आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Shahrukh Khan

Rave Party : आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तीन जणांना सत्र न्यायालयानं उद्यापर्यंत (४ ऑक्टोबर) एनसीबीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अर्यनला आजची रात्र ही कोठडीत घालावी लागणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांसाठी कोठडी मागितली होती. पण कोर्टानं एकच दिवसाची कोठडी सुनावली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबीनं या तिघांना अटक केली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबईतील किला कोर्टात याप्रकरणी संध्याकाळी सात वाजता सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी कोर्टात शाहरुख खानची मॅनेजर आणि वकील सतीश मानेशिंदे हे उपस्थित होते. यावेळी कोर्टात या प्रकरणी विविध मुद्द्यांवर युक्तीवाद झाला. दरम्यान, एनसीबीच्या वकिलांनी कोर्टाकडे या तिघांना दोन दिवसांची म्हणजेच ५ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली. तसेच आर्यनचे वकील मानेशिंदे यांनी आर्यनकडे या पार्टीसाठीचं तिकीट नव्हतं. तो तिथं ड्रग्ज घेण्यासाठी गेला नव्हता असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं या तिघांना एक दिवसाची म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली.

हेही वाचा: आर्यन खानला का झाली अटक?; जाणून घ्या...

कोठडीतील आज-उद्याचा दिवस कसा असेल?

कोर्टातील सुनवणी पूर्ण झाल्यानंतर आता या तिघांना बालार्ड इस्टेट येथील एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आलं असून या ठिकाणीच आर्यनसह अरबाज आणि मुनमुन यांना आजची रात्र घालवावी लागणार आहे. यानंतर उद्या त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये त्यांना विविध प्रश्न विचारण्यात येतील. यामध्ये पार्टीत ड्रग्ज कसे आले? त्याच्या मागे कोण होतं? त्याचा कोणी कोणी वापर केला? अशी माहिती विचारली जाऊ शकते. ही चौकशी पार पडल्यानंतर परवा त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल.

loading image
go to top