चीनला इंगा दाखवल्यानंतर 'एमएमआरडीए'चे 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य; मोनोरेलच्या कामासाठी 'या' कंपन्यांसोबत सुरु आहे चर्चा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारत सरकारने मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, विविध धोरणं जाहीर केली आहेत. त्यानुसार मोनोरेल रेक निर्मितीचे काम भारतीय कंपन्यांना देण्याचा निर्णय झाला . याबाबत शुक्रवारी एमएमआरडीएने तीन भारतीय कंपन्याबरोबर मोनोरेल रेक निमिर्तीची चर्चा सुरु असल्याचे सांगितले.

मुंबई  : भारत-चीन यांच्यात सीमेवर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मुंबईतील दहा मोनोरेलच्या रेकसाठी चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या निविदा रद्द केल्या होत्या. आता या रेक निर्मितीसाठी तीन भारतीय कंपनी इच्छुक असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

अरे बापरे ! आता संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या आनंद वाघालाही...

याबाबत शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल) आणि भारत अर्थ मूवर्स लि. (बीईएमएल) या भारतीय कंपन्यांनाबरोबर चर्चा सुरु असल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली. तसेच मेट्रो 2 ए (दहिसर-डीएन नगर) आणि मेट्रो -7 (दहिसर -अंधेरी ) या मार्गिकेच्या मेट्रो रेक निर्मितीही भारतीय कंपन्याकडे देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. 

...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासठी भारतातील मोठ्या प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यात आले. त्यानंतर एमएमआरडीएने दहा मोनो रेल्वे तयार करण्यासाठी चिनी कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी दोन कंपन्यांनी या निविद्या पाठवल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून सातत्याने नियम-अटी आणि पात्रतेच्या निकषांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एमएमआरडीएकडे होत होती. मात्र सध्यपरिस्थितीत या कंपन्यांची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या. 

मंत्री महोदय म्हणतात, 'कोरोनिल'ने कोरोना बरा होत नाही; खबरदार संभ्रम निर्माण केला तर...

यानंतर भारत सरकारने मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, विविध धोरणं जाहीर केली आहेत. त्यानुसार मोनोरेल रेक निर्मितीचे काम भारतीय कंपन्यांना देण्याचा निर्णय झाला . याबाबत शुक्रवारी एमएमआरडीएने तीन भारतीय कंपन्याबरोबर मोनोरेल रेक निमिर्तीची चर्चा सुरु असल्याचे सांगितले. तसेच एमएमआरडीएने मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 साठी 378 डबे बांधण्याची जबाबदारी बेंगळुरू बीईएमएल कंपनीला दिली आहे. मात्र आता  या मार्गिकेचे मेट्रो रेक निर्मिती भारतीय कंपन्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

भारतीय कंपन्यांचा सहभाग सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांवर मागील दहा वर्षांपासून पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आता अशा प्रकल्पांसाठी भारतीय कंपन्या भेल आणि बीईएमएल या भारतीय उत्पादकांशी संवाद सुरु असल्याचे एमएमआरडीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three indigenous companies interested to work with mmrda for monorail and metrorail