जुहू समुद्रात तिघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - जुहू चौपाटीवर गुरुवारी (ता. 5) पोहण्यास गेलेल्या पाच जणांपैकी तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री एकाचा, तर शुक्रवारी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बेपत्ता असलेल्या एकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

नाझीर रफीक गाझी (17), सोहेल सलील खान (18), फरदीन फिरोज सौदागर (16) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जुहू पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अंधेरीच्या डोंगर परिसरात राहणारे वसीम खान, फरदीन सौदागर, सोहेल शकील खान, नाझीर गाझी, मोहिन शकील खान हे गुरुवारी जुहू चौपाटीवर गेले होते. भरती असल्याने जीवरक्षकांनी त्यांना पाण्यात जाण्यास मनाई केली, तरीही ते समुद्रात गेले. लाटांमुळे चौघेजण बुडू लागताच पाण्यात काही अंतरावर असलेला वसीम कसाबसा बाहेर आला. चार जण बुडाल्याची माहिती त्याने देताच रात्री नौसेना, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली. रात्री दहाच्या सुमारास नाझीरला बाहेर काढल्यावर कूपर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: Three killed in Juhu Sea