'कान' महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - 'कान फिल्म फेस्टिव्हल-फिल्म मार्केट 2017' मध्ये पाठवण्यासाठी राज्य सरकारने तीन मराठी चित्रपटांची निवड केली आहे. सायकल, टेक केअर गुड नाइट आणि दशक्रिया अशी या चित्रपटांची नावे आहेत.

मुंबई - 'कान फिल्म फेस्टिव्हल-फिल्म मार्केट 2017' मध्ये पाठवण्यासाठी राज्य सरकारने तीन मराठी चित्रपटांची निवड केली आहे. सायकल, टेक केअर गुड नाइट आणि दशक्रिया अशी या चित्रपटांची नावे आहेत.

हा महोत्सव 17 ते 28 मे या कालावधीत फ्रान्समध्ये कान येथे होणार आहे. या महोत्सवासाठी पाठवायच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने 16 चित्रपटांतून या चित्रपटांची निवड केली. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. निवड झालेल्या चित्रपटांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी या महोत्सवास जाणार आहेत.

Web Title: three marathi movie for kan mahotsav