कल्याण -डोंबिवलीत नवे तीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

नवीन तीनही रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे डोंबिवलीतील विवाह सोहळ्याशी संबंधित असलेली 60 वर्षीय महिला उपचारानंतर बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 5 झाली आहे.https://www.esakal.com/pune/stay-safe-corona-patient-aarogya-setu-app-provides-alert-276856

कल्याण: कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी 3 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण पश्‍चिमकडील चिकनघर परिसरातील एका 6 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. नवीन रुग्णांपैकी एक 41 वर्षीय पुरुष असून तो डोंबिवली पश्‍चिम भागातील गरीबाचा वाडा या परिसरातील आहे. आता पालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या 24 झाली आहे.

हा खेळ संयमाचा... 
नवीन तीनही रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे डोंबिवलीतील विवाह सोहळ्याशी संबंधित असलेली 60 वर्षीय महिला उपचारानंतर बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 5 झाली आहे. पालिका हद्दीतील 19 कोरोनाबाधित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहे. शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही युद्धपातळीवर आरोग्यसेवेसाठी उपाययोजना करत आहेत. शहरातील अनेक भागही सील करण्यात आले आहेत. 

लॉकडाऊनमुळे इंटरनेट सेवा मंदावली 
लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरीच थांबले आहेत. त्यामुळे घरातून कार्यालयातील काम करणे आणि विरंगुळा म्हणून इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम इंटरनेट सेवेच्या वेगावर झाला आहे. ठाणे जिल्ह्यात याबाबतच्या तक्रारींमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नोकरदार, व्यवसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक वेळ घरात आहेत. ते विविध कामांसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनमुळे इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा मनुष्यबळ अपुरा आहे, असे समजते. त्यामुळे दुरुस्तीची कामे रखडली आहे. सेवा वितरकांनाही या वाढत्या तक्रारींची दखल घेणे अशक्‍य झाले आहे. लॉकडाऊन अगोदार दिवसाला 40 ते 50 तक्रारी येत होत्या. त्या आता 150 पेक्षा अधिक असल्याचे इंटरनेट सेवा व्यावसायिक साई चौधरी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three new patients in Kalyan-Dombivli