आक्‍सा चौपाटीवर तिघांना वाचवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई - आक्‍सा चौपाटीवर बुडणाऱ्या तीन जणांना मंगळवारी (ता.9) जीवरक्षकांनी वाचवले. भरतीमुळे त्या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. जीवरक्षक वेळेवर पोचले आणि त्यांनी तिघांनाही सुरक्षित बाहेर काढले. मागील दीड वर्षांत 70हून अधिक जणांना जीवरक्षकांनी वाचवले आहे.

मालाडमधील मालवणीत राहणारे अल्ताफ मोहम्मद इकबाल शेख, सर्फराज रहीम शेख आणि सूरज गणेश प्रजापती मंगळवारी आक्‍सा चौपाटीवर गेले होते. ओहोटी असताना ते समुद्रातील एका खडकावर जाऊन बसले. तिघेही गप्पा मारण्यात गुंग असतानाच भरती आली. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याने घेरल्याचे लक्षात येताच ते घाबरले. जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर यांनी त्यांना पाहिले. काही वेळात जीवरक्षक खडकाजवळ पोचले. त्यांनी तिघांना जॅकेट आणि रिंग देऊन सुखरूप किनाऱ्यावर आणले.

Web Title: three people life saving on aaksa chaupati