मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात तीन ठार, तीन जखमी 

प्रमोद पाटील
शनिवार, 23 जून 2018

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरई ब्रीज येथे गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर ट्रॅक्स MH15 EX 7559 व टेम्पो MH 04 GR 0199 मध्ये शनिवारी(23) संध्याकाळी चारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्स मधील 3 जण ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एक महिलेचा समावेश आहे. 

मुंबईच्या दिशेने जाणारया ट्रक्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गुजरातकडे जाणाऱ्या गाडीवर सदर गाडी जोराने आदळली. या अपघातात मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. असे मनोर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये यांनी सांगितले, तर जखमी सुरगाणा नाशिक येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना उपचारासाठी हायवे हॉस्पीटल विरार येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास मनोर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये करीत आहेत.

Web Title: Three people were killed and three others injured on the Mumbai-Ahmedabad highway