
Thane Crime
ESakal
डोंबिवली : पादचारी वृध्द महिलांना रस्त्यात एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून पलायन करणाऱ्या उत्तरप्रदेशातील तीन सराईत चोरट्यांना येथील रामनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अटक केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चोरट्यांकडून एक रिव्हाॅल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि 3 लाख 80 हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. अभय सुनील गुप्ता (वय 21), अभिषेक ओमप्रकाश जौहरी (वय 32), अर्पित उर्फ प्रशांत शुक्ला (वय 27) अशी अटक आरोपीची नावे आहेत.