Tue, March 28, 2023

Mumbai Rain : मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Published on : 7 March 2023, 3:08 pm
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD च्या मते, पुढील ३ ते ४ तासांत मुंबईत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD मुंबईसह, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकंट ओढावलं आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.