तिळाला पाहून... गृहिणी म्हणताहेत गोड बोलायचं कसं!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

बाजारात तिळगूळ बनवण्यासाठी लागणारे पॉलिश तीळ १६० रुपये किलो, साधे तीळ १०० ते १२० रुपये किलो; तर चिक्की गूळ ६० ते ७० रुपये किलो आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर संक्रांत ओढवली आहे.

ठाणे : नववर्षातील पहिलाच सण म्हणजे पौष महिन्यातील मकर संक्रांत होय. ग्रामीण ते शहरी भागातील सर्वच या सणाचा आनंद लुटतात. सध्या देशात महागाईदर वाढल्यामुळे संक्रांतीनिमित्त वाटल्या जाणाऱ्या तिळगुळासह, भेटवस्तूंनी भाव खाल्ल्याचे दिसून येत आहे. बाजारात तिळगूळ बनवण्यासाठी लागणारे पॉलिश तीळ १६० रुपये किलो, साधे तीळ १०० ते १२० रुपये किलो; तर चिक्की गूळ ६० ते ७० रुपये किलो आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर संक्रांत ओढवली आहे.

ही बातमी वाचली का? वाढदिवशीच मुलीचा गुदमरून मुलीचा मृत्यू!

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे मकर संक्रांत. साधारण या वेळी कडक थंडीचा कडाका असल्याने शरीराला उष्णता देणारे तीळ, गूळ-शेंगदाणे यापासून तयार होणारी रुचकर खमंग अशी गूळपोळी, तिळाच्या मऊशार वड्या, रेवड्या, गूळ शेंगदाण्याची चिक्की या पदार्थाना मागणी असते. मात्र यावेळी बाजारात तिळगूळ १८० रुपये किलो, तिळाच्या वड्या २०० रुपये किलो; तर राजस्थानचा प्रसिद्ध गजक १४० ते १६० रुपये किलो असून तिळाच्या चिक्कीचे आकर्षक पॅंकेज १४० रु, असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? वेशीवर घडतंय असं काही...; नवी मुंबईकर झालेत त्रस्त!

दर वाढले, तरी खरेदीसाठी महिलांची लगबग
यंदा या दागिन्यांमध्ये तनमणी, गोलाकार हेअरबॅंण्ड, तोडे, मेखला या दागिन्यांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. सुवासिनी वाण म्हणून लुटण्यासाठी काळ्या व लाल मातीतील सुगडं, हरभरा, बोर, उसाचे करवे, हळदीकुंकू, फुले आदी वस्तूंसह हळदी-कुंकूसाठी द्यावयास लागणाऱ्या भेटवस्तूंचे दर वाढले असले तरी बाजारात खरेदीसाठी महिलांची लगबग दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tilgul inflated 'on housewives' budget