दिलासादायक! मुंबईत आजपर्यंत तब्बल 'इतके' रुग्ण झाले बरे..जाणून घ्या आजची कोरोनाची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

 मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे.

मुंबई:  मुंबईत कोरोना बाधित रुग्णांनी आजही हजारचा आकडा पार केला आहे. आजही 1044 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 33,835 झाली आहे. रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण देखील कमी व्हायचे नाव घेत नाहीये.  आज ही 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1097 झाली  आहे. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ९ हजारांवर पोहोचली आहे.             

 मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज 240 रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या 9054 झाली आहे.  मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1097 वर पोचला आहे. 

हेही वाचा: मोठी बातमी! संपूर्ण मुंबईत होणार 'हे' सर्वेक्षण..कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत मिळणार माहिती

आज झालेल्या 32 मृत्यूंपैकी 15 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 19 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय 40 च्या खाली आहे. तर 12 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.   

हेही वाचा: ..अन 'त्यानं' ट्रेनच्या डब्यातच सोडले प्राण; अन्न-पाण्याशिवाय धावतायेत श्रमिक ट्रेन.. 

आतापर्यंत ९ हजार रुग्ण झाले बरे:

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 893 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 27,715 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज 240 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 9054 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

till now 9000 corona patients discharged in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: till now 9000 corona patients discharged in mumbai read full story