मोठी बातमी! संपूर्ण मुंबईत होणार 'हे' सर्वेक्षण..कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत मिळणार माहिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

कोरोनाचा ट्रेंड ओळखण्या बरोबरच समुह प्रसाराचा आढावा घेण्यासाठी मुंबईतही सेरो सर्वेक्षण होणार आहे. देशातील 10 शहरे 60 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण होणार असून त्यात मुंबईतील 5 ठिकाणामधील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

मुंबई: कोरोनाचा ट्रेंड ओळखण्या बरोबरच समुह प्रसाराचा आढावा घेण्यासाठी मुंबईतही सेरो सर्वेक्षण होणार आहे. देशातील 10 शहरे 60 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण होणार असून त्यात मुंबईतील 5 ठिकाणामधील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

या पाच ठिकाणच्या कोविड संपर्कातील हायरिस्क लोरिस्क तसेच सामान्य नागरीकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यातील अॅण्टिबॉडीजची चाचणी करण्यात येणार आहे.18 वर्षावरील व्यक्तींचे ऐच्छिक नमुने घेतले जातील. पालिकेचे स्थानिक वैद्यकिय पथक,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो हिमॅटोलॉजी यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचे पथक हे सर्वेक्षण करणार आहे.आवश्यकते नुसार सर्वेक्षणाच्या आणखी फेर्या देखिल होतील.अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 

हेही वाचा: ..अन् 'त्या' गरीब कुटूंबाच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे ; घाटकोपर मध्ये अडकले होते सोलापूरचे कुटूंब

भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेेच्या अंदाजानुसार कोविड विषाणु देशात अद्याप समुह संसर्गाच्या ( कम्युनिटी ट्रान्समिशन)  टप्प्यात पोहचलेला नाही.मात्र,या अभ्यासामुळे याबाबत निश्चित माहिती मिळणार आहे.

काय आहे सर्वेक्षण?

शरिरात एखादा विषाणु शिरल्यावर शरिरात अॅण्टिबॉडीज तयार होतात.कोरोनाशी लढण्यासाठीही अशा प्रकारच्या अॅण्टिबॉडीज बाधित व्यक्तीच्या शरिरात तयार होत आहेत.या सर्वेक्षणात संबंधित व्यक्तीच्या शरिरात अशा प्रकारच्या अॅण्टिबॉडीच तयार आहेत का हे तपासण्यात येईल.अॅण्टिबॉडीजची वाढ होणे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे लक्षण आहे.

हेही वाचा:..अन 'त्यानं' ट्रेनच्या डब्यातच सोडले प्राण; अन्न-पाण्याशिवाय धावतायेत श्रमिक ट्रेन.. 

याचा फायदा काय?

यातून केविड संक्रमणाचा कल समजून येईल. तसेच हॉटस्पॉट मध्ये संक्रमणाचा भौगोलिक फैलाव समजणेही शक्य होणार आहे.यातून संक्रमणाचे सामाजिक धोके ओळखता येतील. तसेच यातून कोरोनाचा सामुदायिक प्रसार होण्यावर नियंत्रण आणि प्रतिबंध करता येईल.

SERO survey will be done in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SERO survey will be done in mumbai read full story