'नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं...' बाळासाहेबांचं कार्टून काढून भाजपचा निशाणा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

भाजपा महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत खिल्ली उडवण्यात आली आहे. 

विधानसभा  निवडणूकीत सर्वात जास्त जागा मिळवूनही सत्ता न मिळवता आलेल्या भाजपने शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडलेली नाही. नुकतेच भाजपने शिवसेनेवर खरमरीत टीका करणारे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. भाजपा महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत खिल्ली उडवण्यात आली आहे. 

फडणवीसांच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा?

या व्यंगचित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गात भेटतांना दाखवण्यात आले आहे. बाळासाहेब सावरकरांना म्हणतात की, " तात्याराव काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगं नाव काढेल. पण ह्याच्या नावातूनच आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं" 

 

भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या या व्यंगचित्रामुळे आता चांगलाच वाद होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने मंत्री अदित्य ठाकरेंवर  ट्विटरवरून टीका केली होती. तो वाद शांत झालेला नसताना. भाजपकडून नुकतेच हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. होण्याचीही शक्यता आहे.

आता भाजपने केलेल्या या जहरी टीकेला शिवसेनेकडून किंवा मुख्यमंत्री ठाकरे य़ांच्याकडून काय उत्तर मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Time to remove the last name from the name, bjp Criticize Uddhav Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to remove the last name from the name, bjp Criticize Uddhav Thackeray