टिटवाळा : तब्बल ४८ गुन्हे दाखल असलेला चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात | TItwala crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

टिटवाळा : तब्बल ४८ गुन्हे दाखल असलेला चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

टिटवाळा : तब्बल ४८ गुन्हे दाखल (Police FIR) असलेल्या सराईत चोरट्यास टिटवाळा पोलिसांच्या (Titwala Police) गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुंबईतील कामाठीपुरा (kamathipura) येथून मोठ्या शिताफीने जेरबंद (thief arrested) केले आहे. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १३ वर्षांपासून सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

रोहिदास केरकर ऊर्फ गावडे (३५, रा. पणजी-गोवा) असे या चोरट्याचे नाव आहे. गुन्हा केल्यानंतर तो राहण्याची जागा सतत बदलत असल्याने तो सहजासहजी पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता.

गोवा, पणजी, म्हापुसा, कलंगुट, तसेच इतर पोलिस ठाण्यात त्याच्यावर सोनसाखळी चोरीचे २५ गुन्हे दाखल असून, कर्नाटक राज्यात हुबळी व धारवड, तसेच महाराष्ट्रातील ठाणे येथील शिवाजीनगर, कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कल्याणमधील महात्मा फुले चौक, खडकपाडा, उल्हासनगर तसेच टिटवाळा, कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते.

loading image
go to top