Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा
Panvel Municipal Corporation: हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पालिकेने हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल : पालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पनवेल महापालिका १० ठिकाणी अत्याधुनिक हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणार आहे. यानुसार कळंबोली सर्कल येथे यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाल्याने शुद्ध हवा मिळणार आहे.