
Indian Railway
ESakal
मुंबई : महसूल वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबईतील मोक्याच्या जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) महालक्ष्मी येथील भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत, तर वांद्रे पूर्वेतील १०.६ एकरच्या प्रचंड भूखंडासाठी या आठवड्याच्या अखेरीस प्रस्ताव मागवले जाणार आहेत. या दोन प्रकल्पांमधून तब्बल सहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा रेल्वेचा अंदाज आहे.