
Mumbai Metro
ESakal
मुंबई : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे मास्टर प्लॅन असून, त्यांच्याकडून तिकीटवाढीशिवाय मेट्रोच्या जागेत जाहिराती लावणे, स्थानकातील जागा भाड्याने देणे, अशा अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सदर पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.