esakal | अभिनेता साहिल खानची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Sahil Khan And Manoj Patil

अभिनेता साहिल खानची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) काल अभिनेता साहिल खानला (Sahil khan) अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलला (Manoj patil) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा साहिलवर आरोप आहे. मुंबई सत्र न्यायालयानं (Session court) अटकपूर्व जामीन नाकरल्याच्या निर्णयाला साहिलनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

आता अभिनेता साहिल खानने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. साहिलवर बॉडीबिल्डर मनोज पाटिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाशी माझा कोणातीही संबध नसल्याचे साहिलने याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा: 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी मिस्टर इंडियाचा (Mister India) किताब पटकवणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने (manoj patil) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले होते. साहिल खानकडून (sahil khan) मानसिक त्रास दिला जात आहे. धमक्याही (Threaten) दिल्या जात असल्याचा आरोप मनोजने केले होते.

हेही वाचा: SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

साहिल खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप मनोजने केला होता. या प्रकरणी त्याने ओशिवरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी पत्र लिहिले होते. मनोजने सोशल मीडियावर एक ऑडियो पोस्ट केला होता. त्रास आणि बदनामीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे मनोजने आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते.

loading image
go to top