

Meter Testing Process
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. मीटर चाचणी प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने नवीन मीटर चाचणी केंद्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाचे सचिव भरत कलासकर यांनी सांगितले की, सर्व आरटीओ कार्यालयांना दोन महिन्यांत आवश्यक परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.