esakal | जिल्ह्यात काँग्रेसच्या बळकटीसाठी वसईतील चौघांना प्रदेशावर स्थान
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

जिल्ह्यात काँग्रेसच्या बळकटीसाठी वसईतील चौघांना प्रदेशावर स्थान

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य काँग्रेसने नुकतीच राज्यातील कार्यकारिणीची पुनर्रचना केली आहे. पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी करतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पालघर जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जबाबदारीची पदे वाटपात वसई विरार विभागास झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यकारीनवर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते विजय पाटील यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीवर सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर नालासोपाराचे युवा कार्यकर्ते निलेश पेंढारी यांना चिटणीस म्हूणन आणि पालघर जिल्हा नियोजन आणि विकास समितीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर चार महिन्यांपूर्वीच वसईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते, तथा जि. प. चे माजी सदस्य समीर वर्तक यांना प्रदेश काँग्रेसच्या राज्यस्तरीय पर्यावरण विभागवार अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला असून पालघर जिल्यात त्या दृष्टीने पक्ष बांधणी करणयासागा प्रयत्न आता काँग्रेस करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच लवकरच पाक-लंगर जिल्ह्यातील एक्मेव्य महानगर पालिका असलेल्या वसई विरार महानगर पालिकेची निवडणूक लागणार असल्याने ती निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या नेमणुका केल्याचे बोलले जात आहे.वसई विरारवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला गेल्या वेळी वसई विरार महानगर पालिकेवर काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आणता ला नव्हता.

यावेळी मात्र पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा विडा काँग्रेस पक्षाने उचलला असून त्या दृष्टीने पक्षाची बांधणी करण्याचे काम प्रदेशध्यक्ष नाना पाटोळे यांनी हाती घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या नेमणुकीमुळे तरी काँग्रेस पक्षाचे पालिकेत खाते उघडते का ? या कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा: अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजे - राज ठाकरे

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवायचा चंग बांधलेले, मूळचे काँग्रेसवासी असलेले विजय पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून, सेनेच्या तिकिटावर वसईतून विधानसभा निवडणूक लढविली होती. आ हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढतांना पाटील यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी सुमारे 80 हजाराहून अधिक मते मिळवली होती. परंतु त्यानंतर सेनेत त्यांचे मन रमले नाही. दोन महिन्यापूर्वीच ते स्वगृही, अर्थात काँग्रेसमध्ये परतले होते. आता पाटील यांना प्रदेशावर सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली आहे. राज्यात मविआ चे सरकार असल्यामुळे त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली असून, जिल्यातील प्रश्नांसोबतच पक्षाच्या विस्तारासाठी आपण विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे पाटील यांनी बोलतांना स्पष्ट केले.

हेही वाचा: Dombivli : निर्माल्यात टाकले जातेय जुने कपडे, प्लास्टिक..

वसई विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, तथा बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक ओनील आल्मेडा यांना पालघर जिल्हा नियोजन आणि विकास समितीवर स्थान देण्यात आले असून, नालासोपारातील निलेश पेंढारी या युवक कार्यकर्त्यास प्रदेश कार्यकारिणीवर चिटणीस म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर चार महिन्यांपूर्वीच वसईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते, तथा जि प चे माजी सदस्य समीर वर्तक यांना प्रदेश काँग्रेसच्या राज्यस्तरीय पर्यावरण विभागवार अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. वसई विरार महापालिका आणि जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असून, या नेमणुकांचा पक्षाच्या बाळकटीला किती लाभ होतो, हे लवकरच सिद्ध होणार आहे.

loading image
go to top